बलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश!

उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.

Updated: Sep 4, 2015, 12:14 PM IST
बलात्कार पीडितेवर काठ्यांचा वर्षाव, गर्भपात करण्याचा तालिबानी आदेश! title=

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील कौशाम्बीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचं प्रकरण समोर येतंय... धक्कादायक म्हणजे, या घृणास्पद प्रकारानंतर या मुलीला पंचायतीनं काठीनं मारून आणि तिच्या पोटात वाढणारा पाच महिन्यांचा गर्भ पाडण्यात आला.

पंचायतीचा क्रूरपणा इथंच थांबला नाही तर या मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाच्या कुटुंबीयांचं अन्न-पाणी बंद करण्यात आलंय... तसंच त्यांना गावाबाहेर हाकलण्यात आलंय. पंचायतीच्या या तालिबानी निर्णयानंतर गावात स्मशानशांतता पसरलीय. 

मिळालेल्या माहितीनुसार, कौशाम्बीच्या सैनी कोतवाली भागाजवळ घोसियाना गाव २५ ऑगस्टपासून पंचायतीच्या दहशतीखाली आहे. गावातीलच एका अल्पवयीन मुलीला न्याय तर दूर राहिला पण, तिच्यावरच काठ्यांचा वर्षाव करण्याची शिक्षा पंचायतीनं तिला सुनावली. 

इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर या मुलीच्या आईसमोरच त्यांनी डॉक्टरांना बोलावून घेत या मुलीचा तिच्या मर्जीशिवाय गर्भपात केला. 

पोलिसांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. पण, अजूनही पोलीस पीडित मुलगी आणि आरोपीपर्यंत पोहचू शकलेले नाहीत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.