www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बलात्काराच्या घटनांमध्ये तडजोड होऊ शकत नाही आणि या आरोपींना पीडितेनं क्षमा केलं तरीही कायद्यानं त्यांना क्षमा मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. एका खटल्यासंदर्भात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी हे विधान केलंय.
मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती पी. सतशिवम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या पीठानं निर्णय देताना म्हटलं की, ‘अशा प्रकरणांमध्ये जर पीडिता आणि आरोपी यांच्याच तडजोड होत असेल तर ती अवैध आहे आणि खालच्या न्यायालयांमध्येही दुर्मिळ अशा खटल्यांत आरोपींची शिक्षा कमी करण्याच्या अशा मार्गांचा वापर केला जाऊ शकत नाही’.
खालच्या न्यायालयांमध्ये आरोपी आणि पीडिता यांच्यामध्ये तडजोडीच्या घटनांना पाठिंबा देण्याची प्रवृत्ती वाढताना दिसतेय, यावरच सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.