लोकपाल राज्यसभेत मंजूर, लोकसभेत उद्या सादर!

राजकीय रस्सीखेचीनंतर लोकपाल विधेयक शेवटी मंगळवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आहे. हे विधेयक लोकसभेत यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 17, 2013, 07:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजकीय रस्सीखेचीनंतर लोकपाल विधेयक शेवटी मंगळवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आहे. हे विधेयक लोकसभेत यापूर्वीच मंजूर करण्यात आले आहे.
राज्यसभेत हे विधेयक सिलेक्ट कमेटीच्या संशोधनानंतर मंजूर करण्यात आले. आता हे विधेयक पुन्हा लोकसभेत मंजूर करावे लागणार आहे. लोकपाल विधेयक बुधवारी लोकसभेत सादर करण्यात येणार आहे.
दुसरीकडे मजबूत लोकपालाच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले आहे. लोकपाल विधेयक मंजूर झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी संपूर्ण देशाचे अभिनंदन केले. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आपले उपोषण सोडणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले.
यापूर्वी राज्यसभेत भाजप, डावे आणि बसपसहीत बहुतांशी दलांनी मंगळवारी संशोधनासह सादर करण्यात आलेल्या लोकपाल विधेयकाला समर्थन दिले. तसेच देशातील भ्रष्टाचार संपण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही या पक्षांनी सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.