दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात?

दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता रजनीकांत लवकरच आपला राजकीय पक्ष काढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तामिळनाडूत सध्या राजकीय संकट निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष काढावा यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न सुरु असल्याचे बोललं जातंय. 

Updated: Feb 11, 2017, 03:12 PM IST
दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात? title=

नवी दिल्ली : दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता रजनीकांत लवकरच आपला राजकीय पक्ष काढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तामिळनाडूत सध्या राजकीय संकट निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष काढावा यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न सुरु असल्याचे बोललं जातंय. 

संघाचे प्रचारक एस. गुरुमूर्ती हे रजनीकांत यांनी सक्रीय राजकारणात एंट्री मारावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं समजतंय.. रजनीकांत यांची तामिळनाडूत प्रचंड लोकप्रियता आहे. हीच लोकप्रियता मिळवण्यासाठी रजनीकांत यांना राजकारणात उतरवलं जात असल्याच्या चर्चा रंगल्यात. 

यामुळे दक्षिणेकडील राज्यात विशेषतः तामिळनाडूत शिरकाव करण्यासाठी रजनीकांत यांच्या लोकप्रियतेचा भाजपला फायदाच होणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.

जयललिता यांच्या मृत्यूनंतर सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षातील संघर्ष शिगेला पोहचलाय. शशिकला आणि ओ. पनीरसेल्व्हम यांच्यात सध्या वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांमुळे दक्षिणेतल्या राजकारणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.