'मुलावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन'

पुत्राच्या विरोधात करण्यात आलेले आरोप केवळ अफवा असून आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून कायमचा संन्यास घेईन असं आव्हान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलंय.

Updated: Aug 27, 2014, 05:13 PM IST
'मुलावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन' title=

नवी दिल्ली : पुत्राच्या विरोधात करण्यात आलेले आरोप केवळ अफवा असून आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून कायमचा संन्यास घेईन असं आव्हान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलंय.

'माझ्या कुटुंबियांबद्दल जाणूनबुजून अफवा पसरवल्या जात आहेत. मी देशाच्या जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की हे सगळे आरोप खोटे आहेत. माझ्या कुटुंबातील एकाही सदस्यावर आरोप प्रथमदृष्ट्या सिद्ध झाला तर मी राजकारणातून संन्यास घेईन' असं राजनाथ सिंग यांनी आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत म्हटलंय.  

राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांनी बदलीसाठी पोलीस अधिकाऱ्याकडून पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत. आपला मुलगा पंकज सिंह यांच्याविरोधात वारंवार अफवा उठवल्या जात असल्याचं राजनाथ यांचं म्हणणं आहे. भाजपमधल्याच राजनाथ सिंग यांचा विरोधक असलेल्या एका नेत्यानं या अफवा उठवल्याचं बोललं जातंय. 

यामुळे राजनाथ मात्र चिडलेत... याबाबत त्यांनी आरएसएस आणि भाजपकडे तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

दुसरीकडे, पंतप्रधान कार्यालयानंही पंकज सिंग यांना क्लीनचिट दिलीय. राजनाथ सिंग यांच्या कुटुंबीयांवर केले जाणारे आरोप चुकीच आहेत... आणि हा सरकारची इमेज खराब करण्याचा एक प्रयत्न असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.