खुशखबर! आता आपल्या घराजवळ करा रेल्वेचं रिझर्व्हेशन

रेल्वे रिझर्व्हेशनसाठी आपल्याला घरापासून दूर स्टेशनवर लांबच लांब रांगेत उभं राहावं लागतं. मात्र आता आपल्याला रेल्वेचं तिकीट आपल्या घराजवळ मिळेल. रेल्वेनं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलला आपलंसं करत जागोजागी रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर उघडणार आहे. त्यामुळं आता आपण आपल्या घराजवळ, रेल्वे एजंटच्या शिवाय रिझर्व्हेशन करू शकाल. रेल्वेनं या योजनेला हिरवा झेंडा दाखवलाय. 

Updated: Aug 13, 2014, 01:21 PM IST
खुशखबर! आता आपल्या घराजवळ करा रेल्वेचं रिझर्व्हेशन title=

नवी दिल्ली: रेल्वे रिझर्व्हेशनसाठी आपल्याला घरापासून दूर स्टेशनवर लांबच लांब रांगेत उभं राहावं लागतं. मात्र आता आपल्याला रेल्वेचं तिकीट आपल्या घराजवळ मिळेल. रेल्वेनं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलला आपलंसं करत जागोजागी रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर उघडणार आहे. त्यामुळं आता आपण आपल्या घराजवळ, रेल्वे एजंटच्या शिवाय रिझर्व्हेशन करू शकाल. रेल्वेनं या योजनेला हिरवा झेंडा दाखवलाय. 

रेल्वेनं पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपचं मॉडेल स्वीकारलं असून रेल्वे एजंटला रेल्वे रिझर्व्हेशन करण्याची संमती दिलीय. पाच वर्षांपेक्षा जास्त रेल्वे एजंट म्हणून काम केलेल्यांना या योजनेत सहभागी केलं जाईल. यासाठी एजंटला  रेल्वे कंप्युटर, रिझर्व्हेशन स्लीपसह काही अनेक बाबींची मदत करेल. यासाठी एजंटला तिकीटच्या काही टक्के कमिशन मिळेल. रेल्वेच्या मते जवळपास 40 रुपये अधिक देऊन लोकं घराजवळच रेल्वे रिझर्व्हेशन तिकीट घेऊ शकाल. स्लीपर आणि सेकंड सिटिंगसाठी 30 रुपये आणि इतर क्लाससाठी 40 रुपये अधिक शुल्क घेतलं जाईल. 

दरम्यान, रेल्वे रिझर्व्हेशन काऊंटर उघडल्यानंतर एक तासानं हे प्रायव्हेट काऊंटर उघडेल. म्हणजे सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिवाय विकेंडलाही हे काऊंटर सुरू राहतील. तर तात्काळ बुकिंग सकाळी 10च्या ऐवजी 11 वाजता सुरू होईल. या योजनेचा चुकीचा फायदा कोणी घेऊ नये यासाठी एजंटसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. जर कुणी याचा गैरवापर करतांना दिसेल त्यांचं लायसंस रद्द होऊ शकतं किंवा त्यांना दंडही होऊ शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.