रेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर, वेटींगवाल्यांना विमान तिकीट

रेल्वे प्रवाशांसाठी एक खूष खबर आहे, आयआरसीटीसीच्या प्रवाशांना. ज्यांचं तिकीट वेटींगवर असेल त्यांना विमानाचं तिकीट रेल्वे ऑफर करीत आहे. 

Updated: Jun 10, 2015, 10:50 AM IST
रेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर, वेटींगवाल्यांना विमान तिकीट title=

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक खूषखबर आहे. रिझर्वेशन वेटिंगवर असलेल्या प्रवाशांना आता आफलं तिकीट विमानाच्या तिकीटात अपग्रेड करता येणार आहे. रेल्वेनं गो एअरबरोबर करार केला असून त्याअंतर्ग आतापर्यंत १०० तिकीटांची विक्रीही केली आहे.

स्पाईस जेटबरोबर इतरही कंपन्यांशीदेखील रेल्वेची याबाबत बोलणी सुरु असल्याचं IRCTCचे प्रवक्ता संदीप दत्ता यांनी सांगितलं. प्रवासाच्या तारखेच्या किमान ३ दिवस आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांनाच ही सुविधा उपलब्ध असेल, तसंच प्रवासाची तारीख आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचं विमान तिकीट मिळू शकेल.

रेल्वे प्रवाशांना ३० ते ४०  टक्के सवलतीच्या दरात विमानप्रवास करता येणार असल्याचंही दत्ता यांनी स्पष्ट केलंय. विमान कंपन्या आपली विकली न गेलेली तिकिटं रेल्वे प्रवाशांना देतील. यामुळे देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येतही मोठी वाढ होण्याची आशा आहे.           

त्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या तिकीटांच्या किंमतीत विमानानं प्रवास करणं अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना या योजनेचा जास्तीत-जास्त फायदा उचलता येणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.