कोची : आतंरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी योग करतांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना डुलकी आली होती. सुरेश प्रभूंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे देखील केरळमधील कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या योगासनांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योग करत असताना एका क्षणी त्यांना झोप लागली.
यानंतर एक कार्यकर्ता सुरेश प्रभू यांच्या जवळ आला आणि त्यांना निद्रावस्थेतून जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत योग करणारे इतर सहभागी आसन झाल्यावर उठून बसल्यानंतर बराच वेळ प्रभू निद्रिस्त अवस्थेतच होते. उपस्थित छायाचित्रकारांनी ही घटना कॅमेऱ्यात बंद केली.
प्रभूंचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत, कोचीमधील स्थानिक वृत्तपत्रांमध्येही हे फोटो छापून आले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.