खुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा

Updated: Jul 28, 2016, 12:57 PM IST
खुशखबर! रेल्वे प्रवाशांना देणार 10 लाखांचा विमा title=

नवी दिल्लीः रेल्वेने प्रवाशांसाठी 10 लाखांचं विमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुकींग करणाऱ्यांना एक रुपयात 10 लाखांच्या अपघाती विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास प्रवाशांसाठी हा विमा असणार आहे.

तिकीट बुकींग करतांना तुम्हाला अधिक 20 रुपयांचा प्रिमिअम भरावा लागणार आहे. सप्टेंबरपासून रेल्वे प्रवाशांसाठी हे विमा कवच असणार आहे. अपघात झाल्यास विमा कंपनीद्वारे उपचाराचा खर्च देण्याचीही तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. अपघातात आंशिक अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये, जखमी झाल्यास 5 लाख रुपये आणि अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचा विमा देण्यात येणार आहे. किरकोळ जखमींना 10 हजारांची मदत देण्यात येणार आहे.

हा विमा फक्त प्रवासापूरताच मर्यादित असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या स्थानकावरून बसलात तिथून तुमचं तिकीट जेथेपर्यंत आहे त्या स्थानकापूरताच मर्यादित असणार आहे.