जेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आठवले 'प्रभू'

 रेल्वेच्या विशाल नेटवर्कला दुरूस्त करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी 'प्रभू'कडे मदत मागावी लागली, पण शेवटी त्यांनी स्वतः हे शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प केला. 

Updated: Feb 26, 2015, 05:11 PM IST
जेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना आठवले 'प्रभू' title=

नवी दिल्ली :  रेल्वेच्या विशाल नेटवर्कला दुरूस्त करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी 'प्रभू'कडे मदत मागावी लागली, पण शेवटी त्यांनी स्वतः हे शिवधनुष्य पेलण्याचा संकल्प केला. 

लोकसभेत आज आपले पहिले रेल्वे बजेट सादर करताना रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी रेल्वेला सक्षम बनविण्याच्या योजनेबद्दल म्हटले की, परिवर्तन, दुपदरीकरण, तिहेरीकरण आणि विद्युतीकरण यावर जोर देणार. वेग वाढविणार असून गाड्या वेळेवर सोडण्यावर भर देणार, मालगाड्यांना वेळेवर चालविणार... प्रभू यांनी सांगितले की, माझ्या मनात प्रश्न उपस्थित झाला... हे प्रभू, हे कसे होणार, असे म्हटल्यावर सुरेश प्रभूंना आठवलेल्या 'प्रभूं'बद्दल सभागृहात असलेल्या अनेकांनी याला चांगली दाद दिली आणि अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. 

त्यानंतर रेल्वेमंत्री म्हणाले, तेव्हा प्रभूने उत्तर नाही दिले, तेव्हा या प्रभूने विचार केला की गांधीजी ज्या वर्षात भारतात आले, त्याच्या शताब्दी वर्षात भारतीय रेल्वेला भेट मिळाली पाहिजे. त्यामुळे परिस्थिती बदलू शकते. मार्ग शोधले जाऊ शकतात. इतका मोठा देश आहे, इतके मोठे नेटवर्क आहे, इतके सारे संसाधन आहे, इतके विशाल मनुष्यबळ आहे, इतकी मोठी राजकीय इच्छाशक्ती आहे..... तर का नाही होऊ शकत रेल्वेचा पुनर्जन्म... संसदेत उपस्थित असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्र्यांचे भाषण लक्षपूर्ण ऐकत होते. ते भाषण ऐकत असताना लिखीत भाषणाचे पानं उलटत होते. 

सुरेश प्रभू यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधीसह स्वामी विवेकानंद आणि मराठी कांदबरीकार शुभदा गोगटे यांचा उल्लेख केला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.