राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला

सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे. 

Updated: Apr 22, 2017, 08:19 PM IST
राहुल गांधींचा मोदींना खोचक सल्ला  title=

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या वापरावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक सल्ला दिला आहे. दुसऱ्यांना उपदेश करताना स्वत: त्याचं नेतृत्व करून आदर्श निर्माण केलेलं कधीही चांगलं असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

सोशल मीडियाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी करा. स्वत:च्या स्तुतीसाठी नाही, असा सल्ला मोदींनी अधिकाऱ्यांना दिला होता. बैठकांच्यावेळी अधिकारी सोशल नेटवर्किंगवर व्यस्त असतात. यामुळे बैठकांच्यावेळी मोबाईलवरच बंदी घालण्याचा निर्णय मोदींनी घेतला.