'मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये बघायला आवडतं'

मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकवून बघायला आवडतं, असा प्रतिहल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी लगावला आहे.

Updated: Feb 11, 2017, 05:22 PM IST
'मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये बघायला आवडतं' title=

नवी दिल्ली : मोदींना दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकवून बघायला आवडतं, असा प्रतिहल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी लगावला आहे. मोदींनी राज्यसभेमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला मनमोहन सिंग यांना माहिती आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी राज्यसभेमध्ये केली होती.

तसंच काँग्रेस नेत्यांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, या मोदींच्या वक्तव्याचाही राहुल गांधींनी समाचार घेतला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तुम्ही पंतप्रधान आहात, त्यामुळे आमच्या कुंडल्या काढू शकता, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.