नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच, राहुल गांधी सुट्टीवर गेल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपनं तर त्यावरून राहुल गांधींवर जोरदार भडीमार केला. आता राहुल गांधी दिल्लीत परतण्याचे संकेत मिळाले आहे.
राहुल गांधी नेमके कुठं आहेत, याची साधी माहितीही काँग्रेसकडं नव्हती. ते फिरायला गेलेत की विपश्यना करायला, याचाही अतापता पक्षाच्या नेत्यांना नव्हता. आता ते पुन्हा भारतात परतणार असल्याचं समजतंय.
येत्या २० एप्रिलपासून संसदेचं उर्वरित बजेट सेशन सुरू होणार आहे. त्याआधी १९ एप्रिलला काँग्रेसतर्फे भूसंपादन विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालील या मोर्चात राहुल गांधी उपस्थित असतील, असं सांगण्यात येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.