VIDEO : कामगाराला उलटं टांगून मारहाण; कामगाराचा मत्यू

अमृतसरमधून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय. या व्हिडिओत एका फॅक्टरीचा मालक आणि त्याचे सहकारी एका कामगाराला मारहाण करत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीत. 

Updated: Oct 17, 2015, 11:59 PM IST
VIDEO : कामगाराला उलटं टांगून मारहाण; कामगाराचा मत्यू title=

नवी दिल्ली : अमृतसरमधून एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय. या व्हिडिओत एका फॅक्टरीचा मालक आणि त्याचे सहकारी एका कामगाराला मारहाण करत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झालीत. 

रामसिंह असं या कामगाराचं नाव होतं. या कामगारावर चोरीचा आरोप होता. फॅक्ट्रीच्या एका शेडमध्ये हाता-पायाला बांधून त्याला उलटं लटकावण्यात आली आणि त्याला जबर मारहाणही करण्यात आली.

कामगाराच्या पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार, रामसिंह या फॅक्टरीत साफसफाईचं काम करत होता. काही दिवसांपूर्वी फॅक्टरीमध्ये चोरी झाली होती. ही चोरी रामसिंहनचं केल्याचा आरोप फॅक्टरीचा मालक जसप्रीतनं केला... आणि गुरुवारी तो आपल्या इनोव्हा गाडीतून रामसिंहच्या घरी दाखल झाला. 

जसप्रीतनं जबरदस्तीनं रामसिंहला उचलून आपल्याबरोबर घेऊन गेला. त्यानंतर रामसिंह बेपत्ता होता... त्यानंतर आज सकाळी त्याचा मृतदेह मेहता रोडच्या बाजुला पडलेलं आढळलं. यावेळी त्याचे कपडे फाटलेले होते... आणि संपूर्ण शरीरभर मारहाणीचे निशाण होते. 

त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.