बोधगया बॉम्बस्फोटाचं पुणे कनेक्शन?

बोधगया साखळी स्फोट प्रकरणी ‘झी मीडिया’च्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. या स्फोटांचे पुणे कनेक्शन समोर आलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 7, 2013, 04:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बोधगया साखळी स्फोट प्रकरणी ‘झी मीडिया’च्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. या स्फोटांचे पुणे कनेक्शन समोर आलंय.
संशयित दहशतवादी मकबूलनं या साखळी स्फोटांची माहिती २०१२ साली तपास यंत्रणांना दिली होती. मकबूल हा पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील संशयित आरोपी आहे. या स्फोटांच्या चौकशीदरम्यान मकबूलनं हा खुलासा केला होता. त्यामुळं आता पुन्हा एकदा मकबूलची चौकशी होण्याची शक्यता आहे.
कोण आहे मकबूल त्यावर एक नजर टाकूया...
 मूळचा नांदेडचा रहिवासी असलेला मकबूल हा इंडियन मुजाहिद्दीनचा आयईडी एक्सपर्ट म्हणून काम पाहत होता.
 १९९९ मध्ये मकबूलनं इंडियन मुस्लिम मोहमद्दीन मुजाहिद्दीन नावाची संघटना बनवली
 समाज सुधारणा करण्याचा दावा करत मकबूलकडून ही संस्था स्थापन केली होती.
 समाजसुधारणेच्या नावाखाली या संघटनेमार्फत ठिकठिकाणी दहशतवादी कारवाया उघडकीस आल्या होत्या.
 मकबूलचा २००० सालच्या हैदराबाद स्फोटात हात असल्याचं उघड झालं होतं.
 तसंच पुणे जर्मन बेकरी स्फोटात मकबूल संशयित आरोपी आहे.
बोधगयावरचा हल्ला दहशवादी हल्लाच असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंग यांनी दिलीय. तपास यंत्रणांकडून या स्फोटांचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय.
बुद्धगया स्फोटामध्ये तेथील मंदीर सुरक्षित आहे. पण मंदीरातील पवित्र बोधीवृक्षाचं नुकसान झालंय. याच बोधिवृक्षाखली राजकुमार सिद्धार्थला सत्याचा बोध झाला आणि त्यानंतर ते गौतम बुद्ध बनले. त्यामुळे या वृक्षाला बौद्धधर्मीयांमध्ये मोठं श्रद्धेच स्थान आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. मंदीराचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्य़ात येत असून त्याच्या आधारे याचा तपास करण्यात येईल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.