बँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर...

जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

Updated: Nov 11, 2014, 04:00 PM IST
बँकांमधून खर्चासाठी पैसे काढलेले नाहीत तर... title=

मुंबई : जर तुम्ही तुम्हाला दैनंदिन खर्चासाठी लागणारे पैसे बँकेतून काढले नसतील तर तुम्हाला लवकरच एटीएम किंवा तुमची बँक गाठावी लागणार आहे. अन्यथा तुम्हाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

कारण, पब्लिक सेक्टरमधील बँकांचं काम ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झालीय. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आपल्या कर्माचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी केलीय. यासाठी, राष्ट्रीय स्तरावर १२ नोव्हेंबर रोजी या बँकांनी संप पुकारलाय. त्यामुळेच, बँका बंद राहण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संपाला प्रतिसाद देत हजारो संख्येनं बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. ज्यामुळे, बँकांच्या नियमित कामावर परिणाम दिसून येऊ शकतो.

महत्त्वाचं म्हणजे, बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ तर करण्यात आलीय पण ती बँकांनी केलेल्या मागणीनुसार नाही. या कर्मचाऱ्यांच्या पगारात २३ टक्के वाढ करण्यात आलीय. पण, कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगार वाढवून हवाय. त्यामुळचे या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.