नवी दिल्ली: प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रियांका गांधींकडे काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवण्याची मागणी देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. गेल्या वर्षभरात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची कामगिरी असमाधानकारक राहिलीय. त्या पार्श्वभूमीवर, प्रियांका यांना सक्रिय राजकारणात उतरवण्याची निर्णय घेण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.
राहुल गांधी यांच्याकडे लवकरच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. सोबतच पियांका गांधी यांची नियुक्ती सरचिटणीसपदी होणार असल्याची माहिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.