नवी दिल्ली : भारत साकारण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला या स्वच्छतेच्या मोहिमेशी जोडण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वच्छ भारत अभियानाची आज गांधी जयंतीच्या निमित्ताने सुरुवात केली. आज राष्ट्रपीता महात्मा गांधींजींची जयंती, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींनी श्रद्धांजली वाहीली.
राजघाटवर जाऊन मोदींनी बांपूंच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी अनेक मोठे नेतेही उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधानांनी विजय घाटवर जाऊन लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचंही दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. मोदी आज स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.
स्वच्छ भारत अभियानासाठी घेण्यात आलेल्या लोगो डिझाईन आणि घोषवाक्य स्पर्धेच्या विजेत्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी अभियानाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी सत्कार करणार आहेत. ‘मायगव्हर्न या ऑनलाइन अभियानाद्वारे लोगो आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली होती. विजेत्या लोगोमध्ये महात्मा गांधींच्या चष्म्यावर दोन्ही बाजूला ‘स्वच्छ भारत’ असे लिहून दोन्ही काचांना जोडणाऱ्या पट्टीवर भारतीय ध्वजातील तीन रंग वापरून अवघा भारत या ‘स्वच्छ भारत’ अभियानात सहभागी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. तर ‘एक कदम, स्वच्छता की ओर’ या घोषवाक्यात प्रत्येक भारतीय या अभियानाच्या दिशेने वळतील, असा आशय व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना दीडशेव्या जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली होती. यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळाला कामाला जुंपले आहे. नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या समाधीस्थळी घेतल्यानंतर दलित वसाहतीस भेट दिली. इंडिया गेटमधून ते या राष्ट्रीय अभियानास प्रारंभ केला. प्रत्येक व्यक्तीने वर्षातील शंभर तास स्वच्छतेला द्यावेत, असे आवाहन मोदी यांनी केले आहे.
स्वच्छ भारत अभियानासाठी देशपातळीवरील लोगो आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ५१६८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरचे अनंत खासबारदार हे लोगो डिझाईन स्पर्धेचे, तर गुजरातच्या राजकोटमधील भाग्यश्री शेठ या घोषवाक्य स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या आहेत. खासबरदार यांना ५० हजार रुपयांची रोख रक्कम तर भाग्यश्री यांना २५ हजार रुपये रोख देऊन गौरविण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.