नवाडा : हिंदू-मुस्लिमांनी यांनी एकत्र येऊन गरिबी,दारिद्र्य या विरोधात काम केले पाहिजे असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा दादरी मुस्लिम हत्याप्रकरणी आपले मौन सोडले आहे.
दादरीमधल्या मुस्लीम हत्यप्रकरणी देशभरात रण उठले असताना नरेंद्र मोदींच्या मौनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
देशाला एकोपा आणि शांततेची गरज असून कुठल्याही राजकीय नेत्याचं अगदी माझंही ऐकू नका, आणि या विषयावर माननीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जो संदेश काल दिलाय त्याचं पालन करा, असे आवाहन हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांना केले आहे.
दादरी घटनेनंतर भाजपा संघपरीवारातील नेत्यांसोबतच समाजवादी पार्टीच्या, काँग्रेसच्या आणि अन्य पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर टीका-टीप्पणी करून वादंग निर्माण केले होते.
त्यामुळे उत्तर भारतातील वातावरण हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वितुष्ट निर्माण होण्यास हातभार लागला. मात्र, या सगळ्यावर नरेंद्र मोदींनी चकारही शब्द काढला नव्हता.
बिहारमधल्या प्रचारसभेत बोलताना मोदींनी देशाला विकासाची गरज असल्याचे सांगताना, जर देशात एकोपा नसेल, सद्भावना नसेल, शांतता नसेल तर काय उपयोग असे सांगत या विषयावर जातीय विद्वेष भडकवणा-या कुणाचंही ऐकू नका केवळ एकोप्याचा संदेश देणा-या प्रणव मुखर्जींचा संदेश ऐका असे आवाहन मोदींनी केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.