www.24taas.com,कोलकाता
राष्ट्रपतीपुत्र आणि काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील खासदार अभिजीत मुखर्जी यांनी महिलांच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य केलयं. महिला पहिल्यांदा मोर्चे काढतात आणि त्यानंतर त्या डिस्को थेकला जातात असंही मुखर्जी यांनी म्हटलयं.
महिलांचं आंदोलन म्हणजे निव्वळ फॅशन असते असंही ते म्हणायला विसरले नाही. आंदोलन करणा-या महिला मेकअप करुन इंटरव्ह्यू देतात अस बोलून त्यांनी यावर कडी केलीये. या वादग्रस्त व्यक्तव्यावर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.
अभिजीत मुखर्जींच्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर त्यांनी हे विधान मागे घेत असल्याचं जाहीर केलयं.
अभिजीत मुखर्जी यांच्या भगिनी शर्मिष्ठा यांनीही या प्रकरणी अभिजीत यांनी माफी मागायला हवं असं म्हटलय. अभिजीत यांनी असं वक्तव्य का केलं? असा प्रश्न त्यांनाही पडलाय.