'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?

Updated: Nov 8, 2015, 01:53 PM IST
'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा... title=

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?

अधिक वाचा - ...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे

हा चाणक्य आहे प्रशांत किशोर... होय, तोच प्रशांत किशोर ज्यानं 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फुग्यांमध्ये जाहिरातींची हवा भरली होती. याच प्रशांतनं यावेळी, नरेंद्र मोदींच्या विरोधात जात नितीश कुमारांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचललाय. 

अधिक वाचा - नितिश कुमारांच्या गाजलेल्या गाण्याला मराठी मुलीचं संगीत

प्रशांत किशोरची टीम अमेरिकन राष्ट्रपतींच्या स्ट्रॅटर्जीप्रमाणे नेत्यांमध्ये आणि जनतेमध्ये संवाद घडवून आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करते. मोदींच्या 'चाय पे चर्चा'नंतर 'ब्रेकफास्ट विद सीएम' हा कार्यक्रमही याच टीमनं आखलेला.


प्रशांत किशोर 

जाहिरात कॅम्पेनचं महत्त्व याही निवडणुकीत दिसून आलं. डिसेंबर 2014 मध्ये नरेंद्र मोदींची साथ सोडत प्रशांतनं नितीश यांच्या कॅम्पेनवर लक्ष केंद्रीत केलं. भाजपच्या भडक भगव्या रंगाला टक्कर देण्यासाठी प्रशांतनं बिहार निवडणुकीत महाआघाडीच्या प्रचारासाठी लाल आणि पिवळ्या रंगाचा वापर केलेला दिसला.

अधिक वाचा - महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर हेच चित्र दिसेल - राऊत

'चौपाल पर चर्चा', 'पर्चे पर चर्चा', 'हर घर दस्तक', कॉमिक्स 'मुन्ना से नीतीश' यांच्यासहित 'आस्क नितीश'सारखे हायटेक कार्यक्रमही प्रशांतच्या टीमनं आखले होते.

अधिक वाचा - बिहार निकालानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या

आपणंच तयार केलेल्या 'ब्रॅन्ड मोदी'ला स्वत:च आव्हान देत 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देत प्रशांतनं आपली कामाची बांधिलकीही ठसठशीतपणे मांडलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.