मद्य सम्राट पॉन्टी चड्ढाची गोळी झाडून हत्या

मद्यसम्राट पॉन्टी चड्ठा यांची शनिवारी दुपारी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दिल्लीतील छतरपूर येथील पॉन्टीच्या फॉर्महाऊसमध्ये अचानक चार पाच हल्लेखोर दाखल झाले त्यांनी केलेल्या बेछुट गोळाबारात पॉन्टी चड्ठाची हत्या झाली.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 17, 2012, 03:30 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मद्यसम्राट पॉन्टी चड्ठा यांची शनिवारी दुपारी गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. दिल्लीतील छतरपूर येथील पॉन्टीच्या फॉर्महाऊसमध्ये अचानक चार पाच हल्लेखोर दाखल झाले त्यांनी केलेल्या बेछुट गोळाबारात पॉन्टी चड्ठाची हत्या झाली.

या गोळीबारात पॉन्टीचा भाऊ हरदीप हा देखील ठार झाला आहे. या घटनेत फॉर्महाऊसच्या बाहेर असलेल्या गार्डलाही गोळी लागली आहे. हल्लामागील कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी पोलीसपथक दाखल झाले असून यावेळी त्यांनी एक स्कॉर्पिओ कार जप्त केली आहे.
संपत्तीच्या वाटणीसंदर्भात फार्म हाऊसवर बैठक बोलावली होती. या बैठकीत पॉन्टी चड्ढासह हरदीप चड्ढा आणि काही व्यक्ती हजर होते. या बैठकीत वाद वाढला आणि दोन्ही भावांनी एकमेकांवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही भाऊ गोळीबारात ठार झाले.
कोण आहे पॉन्टी चड्ढा
पॉन्टी चड्ढा हे उत्तर प्रदेशातील दारूचे सर्वात मोठे व्यापारी आहे. त्याचे वडील युपीतील मुरादाबादमध्ये दारूचे ठेकेदार होते. येथून सुरू झालेला हा व्यापार पंजाब आणि हिमाचलपर्यंत विस्तारलेला होता. या शिवाय रिअर इस्टेटमध्येही पॉन्टी चड्ढा यांनी प्रवेश केला होता. त्याचा काही मोठ्या प्रकल्पात पैसा लागला होता. त्याची व्यवसायिक संपत्ती सुमारे ५० हजार कोटी रुपयांची आहे.