फरार नारायण साईचा `राजकीय पक्ष`

गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 8, 2013, 11:29 AM IST

www.24taas.com, झी मीडिया
गेल्या सहा ऑक्टोबरपासून फरार असलेला नारायण साई याने चक्क एका राजकीय पक्षाची स्थापना केलीय. नारायण साईच्या कथित पार्टीच्या कार्यकर्त्यानेच हा खुलासा केलाय.
बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या कथावाचक आसाराम बापूचा फरार घोषित करण्यात आलेला मुलगा नारायण साईनं ‘ओजस्वी पार्टी’ या नावाने एक राजकीय पक्ष सुरू केल्याचा दावा केला गेलाय. ‘ओजस्वी पार्टी’चा उपाध्यक्ष असण्याचा दावा करणारा स्वामी ओमजी याने ‘झी मीडिया’ला समोर ‘साईं पोलिसांपासून पळत नाहीत तर ते आपल्या पार्टीच्या प्रचारात व्यस्त आहेत आणि लोकांच्या भेटी घेत आहेत’ असं म्हटलंय. ‘नारायण साई जिथे कुठे असतील, तिथून ते आपणाला पाहतायत’ असंही त्यानं म्हटलंय.
सहा ऑक्टोबर रोजी सुरतमध्ये झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर गायब असलेल्या नारायण साईला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलंय. मिळालेल्या माहितीनुसार, साई दिल्लीच्या जंतर-मंतरमध्येही दाखल झाला होता. पण, रुपात केलेल्या बदलामुळे दिल्ली पोलीस त्याला ओळखू शकले नाहीत.
ओमजीच्या म्हणण्यानुसार, साईचा हा पक्ष दिल्ली विधानसभेच्या सर्व म्हणजे ७० जागांवर निवडणूकही लढवणार आहे. ‘निलम दुबे ही आसाराम बापूंची अधिकृत प्रवक्ता नाही’ असाही दावा त्यानं केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.