मद्यधुंद पोलीसाची भर रस्त्यात 'रासलीला'

मद्यधुंद अवस्थेतील एका पोलीस शिपायाने भर रस्त्यात रासलीला सुरू केली. याला ना कोणाची लाज ना कोणाची भीती.. नशेत तो विचित्र वागतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

Updated: May 6, 2015, 07:05 PM IST
मद्यधुंद पोलीसाची भर रस्त्यात 'रासलीला' title=

लखीमपूर : मद्यधुंद अवस्थेतील एका पोलीस शिपायाने भर रस्त्यात रासलीला सुरू केली. याला ना कोणाची लाज ना कोणाची भीती.. नशेत तो विचित्र वागतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

सुलखान यादव असे या शिपायाचे नाव असून या पोलिसांचे चाळे पोलिस खात्याला शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यातील आहे. पोलिस गणवेशात असलेल्या या पोलीसाने भरपूर दारू पिऊन आपल्या प्रेमिकेलाही पाजली आहे. 

दोघांनी दारू प्यायल्यानंतर ते मद्यधुंद अवस्थेत भर रस्त्यात रासलीला करत आहे. येथे दोघांना लाज नाही पण इतर लाजेने तोंड लपवत फिरत आहेत. या प्रकारानंतर एपीच्या आदेशानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याची वैद्यकीय चाचणी केली. शिपायाला तात्काळ निलंबित केले आहे. 

पाहा हा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.