सलमानला शिक्षा : बिहारच्या सयामी मुली साबा-फराह यांनी सोडले जेवण

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या मानलेल्या सयामी बहिणींनी जेवण खाण सोडले आहे. 

Updated: May 6, 2015, 06:01 PM IST
सलमानला शिक्षा :  बिहारच्या सयामी मुली साबा-फराह यांनी सोडले जेवण title=

पाटणा : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या मानलेल्या सयामी बहिणींनी जेवण खाण सोडले आहे. 

बिहारमधील सयामी मुली साबा-फराह यांनी सलमान प्रति आपले प्रेम दाखविण्यासाठी उपवास सुरू केला आहे. 

हिट अँड रन केसमध्ये सलमानला आज पाच वर्षाची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हा निकाल लागल्यानंतर दोन्ही बहिणींनी दुपारचे जेवण घेण्यास नकार दिल्याचे या १८ वर्षीय सयामी मुलीचे वडील शकील अहमद यांनी सांगितले. 

सलमान खान विरोधात निकाल लागल्यानंतर या दोघी निराश झाल्या आणि त्यांना धक्का बसला. साबा आणि फराह या पाटणा येथली समानपुरा भागात राहत असून त्याचे सलमानशी खूप चांगले नाते आहे. सलमानने या दोघींना विमानाने मुंबईला बोलावले होते आणि त्यांची राखी बांधण्याची इच्छा तीन वर्षांपूर्वी पूर्ण केली होती. 

सलमान खानसाठी त्या दुवा मागत असल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.