१९७१ च्या युद्धात शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबाचा सन्मान

१९७१ मध्ये बांगलादेशचं स्वतंत्र आणि आताच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पिता आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी भारतीय सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय जवानांनी १९७१ मध्ये बांग्लादेशला स्वतंत्र मिळवून दिलं. तर त्यांच्या कुटुंबाला देखील वाचवलं होतं. 

Updated: Apr 8, 2017, 05:28 PM IST
१९७१ च्या युद्धात शहीद भारतीय जवानांच्या कुटुंबाचा सन्मान title=

नवी दिल्ली : १९७१ मध्ये बांगलादेशचं स्वतंत्र आणि आताच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे पिता आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी भारतीय सेनेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय जवानांनी १९७१ मध्ये बांग्लादेशला स्वतंत्र मिळवून दिलं. तर त्यांच्या कुटुंबाला देखील वाचवलं होतं. 

बांगलादेशसाठी भारतीय जवानांनी केलंला संघर्ष आणि बलिदानाला विसरता येणार नाही. यामुळेच आज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पंतप्रधान मोदी यांनी १९७१ च्या युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबाला सन्मानित केलं.

या खास प्रसंगी पंतप्रधान हसीना यांनी मेजर अशोक तारा आणि त्यांची पत्नी यांची देखील भेट घेतली. मेजर अशोक तारा हे तेच आहे ज्यांनी १९७१ च्या युद्धात शेख हसीना यांचे पिता मजबिर रहमान आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवलं होतं.