पंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर त्यांच्या या भेटीवर अनेकांनी टीका केली.

Updated: Jan 5, 2016, 06:58 PM IST
पंतप्रधान मोदींना 'शरिफ' यांचा फोन, 'हल्ल्यातील दोषींवर करणार कारवाई' title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर त्यांच्या या भेटीवर अनेकांनी टीका केली. ही टीका थांबत नाही की तेवढ्यात पठानकोट येथे दहशदवादी हल्ला झाला आणि टीकेला अजून तीव्र झाली. पण नवाज शरिफ यांनी पंतप्रधान मोदी यांना फोन केला.

श्रीलंका येथून पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून पठानकोट हल्ल्यावर मदत करण्याचा विश्वास दाखवला. भारताने ७२ तासांमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेवर कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला आहे.

पंतप्रधान शरिफ यांनी या विरोधात आरोपींवर कारवाईचं पूर्ण आश्वासन दिलं आहे. भारत सरकारने पाकिस्तानला दहशदवाद्यांकडे असलेल्या सामग्री हा पाकिस्तानातील असल्याचे पुरावे दिले आहेत.