सुरक्षेविषयी काही त्रुटी; संरक्षण मंत्र्यांची कबुली

पठाणकोट हल्ल्याबाबत भारतीय लष्कराच्या सुरक्षेविषयीच्या काही त्रुटी आढळल्याची कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलीय. एअरबेसची सुरक्षा एवढी कडक असताना दहशतवादी घुसलेच कसे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

Updated: Jan 5, 2016, 06:03 PM IST
सुरक्षेविषयी काही त्रुटी; संरक्षण मंत्र्यांची कबुली title=

पठाणकोट : पठाणकोट हल्ल्याबाबत भारतीय लष्कराच्या सुरक्षेविषयीच्या काही त्रुटी आढळल्याची कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलीय. एअरबेसची सुरक्षा एवढी कडक असताना दहशतवादी घुसलेच कसे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

पठाणकोट हल्ल्यानंतर पहिल्यांदाच संरक्षणमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलीय. लष्करानं केलेल्या दहशतवाद्यांविरोधातल्या कारवाईत ज्या वस्तू हस्तगत केल्या आहेत, त्या पाकिस्तानमधल्या असल्याचं निष्पन्न झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसंच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून संवाद साधल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.