पंतप्रधान मोदींचं कपीलला सडेतोड प्रत्युत्तर

मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. 

Updated: Sep 12, 2016, 09:30 PM IST
पंतप्रधान मोदींचं कपीलला सडेतोड प्रत्युत्तर title=

मुंबई : मागच्या पाच वर्षांपासून मी 15 कोटी रुपये कर भरला आहे, तरीही माझं ऑफिस बांधण्यासाठी मुंबई महापालिकेला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते. कुठे आहेत अच्छे दिन, असं ट्विट कपील शर्मानं केलं होतं. हे ट्विट करताना कपीलनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग केलं होतं. कपीलच्या या ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

कपील शर्माला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. कपील शर्माच्या ट्विट आधीच मोदींनी याबाबत भाष्य केलं होतं. 6 ऑगस्टला मोदींनी माय गव्हर्नमेंट कार्यक्रमात या संदर्भाबाबत मोदी बोलले होते. 

ग्रामपंचायतीपासून राज्यसरकारपर्यंत काही ओपिनियन मेकर पंतप्रधानांना दोषी धरतात. हे टीआरपी मिळवण्यासाठी चांगलं आहे, पण यामुळे गव्हर्नन्सला नुकसान होतं, असं मोदी म्हणाले होते. तोच व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

 पाहा काय म्हणाले नरेंद्र मोदी