वाराणसी : रेल्वेचं खासगीकरण होणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीत स्पष्ट करत लाखो रेल्वे कर्मचा-यांना दिलासा दिला..
रेल्वेच्या खासगीकरणाची नेहमीच चर्चा असते पण ही अफवाच आहे असं मोदी म्हणाले. माझ्या आयुष्याला रेल्वेनं एक वळण दिलंय त्यामुळे माझं रेल्वेवर प्रचंड प्रेम असल्याचं ते म्हणाले. वाराणसीत रेल्वेच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली.
पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी एका चॅनलच्या कार्यक्रमात रुळांवरून खासगी रेल्वेही धावायला हवी. रस्त्यावरून सरकारी गाड्यांसोबत खासगी वाहनेही धावातात तर खासगी रेल्वे का नको असा प्रश्न विचारला होता. पण त्यांनी आता त्यांनी यू टर्न घेत रेल्वेचे खासगीकरण होणार नाही असे स्प,ट केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.