नवी दिल्ली : नरेंद्र मोदी हे सतत परदेश दौऱ्यावर आहेत, अशी सतत टीका होत असतांना नरेंद्र मोदी हे ७ जूनपासून बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत.
मोदी सरकार सध्या आपल्या वर्षपूर्ती साजरं करतंय, त्याच वेळी त्यांचा बांगलादेश दौऱ्याची बातमी आल्याने पुन्हा 'फ्लाईट मोड' सारख्या एसएमएस आणि टिकांना उधाण येणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश सोबतचे द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून पासून, दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहेत.
गतवर्षी मोदी यांनी निवडून जिंकल्यानंतर शेख हसिना यांनी मोदींना बांगलादेश भेटीचे निमंत्रण दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मोदी बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत.
'या दौऱ्याद्वारे दोन देशांमधील संबंध अधिक बळकट करणे अपेक्षित असल्याचेही मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
ढाक्यातील भारताचे उच्चायुक्त पंकज सरन यांनी शिष्टाचार आणि इतर मुद्यांवर बांगलादेशच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वार याबाबत माहिती दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.