पंतप्रधानांच्या हस्ते किसान वाहिनीचं उदघाटन

सरकारी दूरचित्रवाणी दूरदर्शनच्या वतीने 'डीडी किसान' ही शेतकरी-केंद्रित वाहिनी सुरू करण्यात आली आहे. 

Updated: May 26, 2015, 06:08 PM IST
पंतप्रधानांच्या हस्ते किसान वाहिनीचं उदघाटन title=

नवी दिल्ली : सरकारी दूरचित्रवाणी दूरदर्शनच्या वतीने 'डीडी किसान' ही शेतकरी-केंद्रित वाहिनी सुरू करण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'डीडी किसान' या वाहिनीचे आज उद्घाटन करण्यात आले.  शेतीवर आधारीत कार्यक्रम प्रसारीत करणारी ही वाहिनी, २४ तास प्रसारण करणार आहे.

शेती करणाऱ्यांना सन्मान मिळायला हवा. शेती व्यवसाय उत्तम समजला जात होता. परंतु, चक्र फिरले असून, त्याला कमी समजले जात आहे. 

हे चक्र पुन्हा एकदा आम्ही उलटू. देशाला पुढे न्यायचे असेल तर गावाला पुढे घेऊन जावे लागले. जर, गावाला पुढे न्यायचे असेल तर गावातील शेतकऱ्याला पुढे न्यावे लागेल, असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

'प्रत्येक राज्यात शेतकरी आहेत. त्यामुळे केबल कायद्यानुसार डीडी किसान ही 'मस्ट कॅरी' वाहिनी बनविण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे प्रक्षेपण करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे,' असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.