पंतप्रधान मोदींनी सैन्यदलाच्या तीनही प्रमुखांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सैन्यदलाच्या तीनही प्रमुखांची भेट घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी हवाई, सायबर स्पेस आणि अन्य विशेष अभियानांदरम्यान येणारी आव्हानं आणि सुरक्षासंदर्भात धोका टाळण्यासाठी काय उपाययोजना हव्या यासंदर्भात चर्चा केली.

Updated: Oct 17, 2014, 05:59 PM IST
पंतप्रधान मोदींनी सैन्यदलाच्या तीनही प्रमुखांची घेतली भेट title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सैन्यदलाच्या तीनही प्रमुखांची भेट घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी हवाई, सायबर स्पेस आणि अन्य विशेष अभियानांदरम्यान येणारी आव्हानं आणि सुरक्षासंदर्भात धोका टाळण्यासाठी काय उपाययोजना हव्या यासंदर्भात चर्चा केली.

तसंच देशातील आणि देशाबाहेरील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्यानं काय तयारी केली आहे याची माहिती या बैठकीत पंतप्रधान सैन्य प्रमुखांकडून घेण्यात आली. संरक्षण मंत्री अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही या बैठकील उपस्थित होते.

दरम्यान, भारताच्या पहिल्या सबसॉनिक आण्विक क्षेपणास्त्राची. निर्भय या क्रुझ क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी झाली. DRDOनं डिझाईन केलेल्या या क्षेपणास्त्राद्वारे हजार किलोमीटरपर्यंत दूर असलेल्या लक्षाचा अचूक वेध घेता येणं शक्य होणार आहे.  जगातील कोणत्याही रडार तसंच हायटेक एअर डिफेंस सिस्टीमला चकवा देण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. 

जमीन, समुद्र आणि हवा अशा तीनही ठीकाणांवरून मोबाईल मिसाईल लाँचरच्या सहाय्यानं या क्षेपणास्त्राचा मारा करता येऊ शकतो.. एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर तीच्यावर कंट्रोलकरता येतो आणि तिला हव्या त्या दिशेनं वळवून लक्षावर अचूक मारा करता येणं या क्षेपणास्त्राद्वारे शक्य आहेत. जगातील अमेरिका, रशिया, चीन, अशा काही मोजक्या देशांकडे लांब पल्ल्याचे क्रुझ क्षेपणास्त्र आहेत. त्याद्वारे दोन हजार किलोमीटरपर्यंत दूर लक्ष्याचा वेध घेणं शक्य आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.