पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी चार दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना झाले. व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौऱ्यावर गेले आहेत. 

Updated: Aug 30, 2014, 12:44 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना title=

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी चार दिवसांसाठी जपान दौऱ्यावर रवाना झाले. व्यापारी आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान जपान दौऱ्यावर गेले आहेत. 

मोदींच्या या दौऱ्यातून दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. या दौऱ्यामुळं दोन्ही देशांतील द्विपक्षी संबंध अधिक दृढ होतील, तसंच देशांमधील आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार्य वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. 

संरक्षण, नागरी अणुऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार होणार आहेत. जपानमधील स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या क्योटो शहराला पंतप्रधान सर्वांत आगोदर भेट देणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे त्यांचं स्वागत करणार आहेत. त्यानंतर मोदी जपानची राजधानी टोकियोला भेट देणार आहेत. 

पंतप्रधानांच्या या दौऱ्यात एक सप्टेंबरला रोजी होणाऱ्या द्विपक्षीय बैठकीत काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. बुलेट ट्रेन आणि आण्विक करार या मुद्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.