लाल किल्ल्यावरून : 'कम, मेक इन इंडिया...' - मोदींचा नवा मंत्र

आज भारताचा 68 वा स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावलाय. यावेळी, सैन्य दलानं पंतप्रधानांना सलामी दिली. तसचं, पंतप्रधानांना 'गार्ड ऑफ ऑनर' देऊन सन्मानित करण्यात आलं... 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 21, 2014, 10:22 AM IST
लाल किल्ल्यावरून : 'कम, मेक इन इंडिया...' - मोदींचा नवा मंत्र title=
लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : 15 ऑगस्ट... आज भारताचा 68 वा स्वातंत्र्यदिन... नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी साडेसातच्या सुमारास ध्वजवंदन केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. 

‘कम, मेक इन इंडिया’, असा नवा नारा त्यांनी यावेळी दिला तर नियोजन आयोगाच्या ऐवजी नव्या संस्थेची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली. आपल्या जवळपास एक तासाच्या भाषणात मोदींनी देशाचा विकास, गरिबी, तरुणाई, वाढते बलात्कार, नक्षलवाद आदी विषयांवर भाष्य केलं. कुठल्याही सुरक्षेशिवाय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं. यावेळचं मोदींनी केलेलं हे भाषण स्वयंस्फुर्तीनं केलं, याचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.  

‘मी देशाचा पंतप्रधान नाही, तर प्रधानसेवक या नात्यानं देशवासियांशी संवाद साधत’ असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मेड इन इंडिया’ही टॅगलाईन जगभरात पोहचवा, असंही आवाहन मोदींनी केलंय.

लाल किल्ल्यावरील भाषणात मोदींनी बेटी बचावचा नारा दिला.. स्त्रीभ्रूण हत्येचा उल्लेख करत कोमल कळीचा बळी का घेता? असा सवाल पंतप्रधानांनी उपस्थित केला.. 

भाषणाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लालकिल्यावर येऊन ध्वजवंदन केलं. यावेळी लालकिल्यावर जनसागर उसळला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...

| 'ब्रिक्स' देशांना गरिबीतून बाहेर पडण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन
| 'मारनेवाले से बचानेवाले की '
| भारतातून गरिबी हद्दपार करण्याचा संकल्प
| वेळेची गरज आहे, गरिबीशी लढाई लढण्यीच 
| त्यावेळी कोणती आपल्याकडे शस्त्रं होती, कोणती हत्यारं होती?
| स्वातंत्र्याची लढाई लढताना आपण एकत्रितच लढलो
| नवे विचार, नवा विश्वासात, नव्या जोशात काम सुरु करा
| योजनेअंतर्गत प्रत्येक खासदारानं 5 वर्षात 5 गावं आदर्श करावीत
| देशाचा विकास गावांपासूनच
| 'संसद आदर्श ग्राम योजना'
| पण, आज पहिल्यांदाच संसदेच्या नावानं योजना घोषित करतोय
| अनेक नेत्यांच्या नावानं आजपर्यंत अनेक योजना आहेत...
| आणि मला हे काम आजपासूनच सुरु करायचंय
| 'सीएसआर'चा निधी शाळेत टॉयलेट बनवण्यासाठी वापरण्याचं आवाहन
| भारताच्या प्रत्येक शाळेत टॉयलेट असायलाच हवं 
| 'मी हे मनापासून सांगतोय' - नरेंद्र मोदी
| केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत, तर समाज 
| महात्मा गांधींच्या जयंतीला आपण स्वच्छ भारत देऊ  
| महात्मा गांधींनी भारत जगभरात पोहचवला 
| सव्वाशे करोड देशवासियांनी संकल्प केला तर हे सहज शक्य
| आपला देश कधीही स्वच्छ होऊ शकतं नाही?
| सरकारमध्ये येऊन पहिलं काम सफाईचं सुरु केलं
| 'टुरिझम' क्षेत्राला वाढवायचंय
| 'डिजिटल इंडिया' हे आमचं स्वप्न... गरिबांसाठीही, गावांसाठीही
| झिरो इफेक्ट - पर्यावरणाला धोका पोहचणार नाही
| झिरो डिफेक्ट - जगातून परत येणार नाही
| मॅन्युफॅक्टरिंग 'झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट' असायला हवी
| उत्पादन क्षेत्राला प्राधान्य देणार
| 'मेड इन इंडिया' हे आपलं स्वप्न असायला हवं
| 'कम, मेक इन इंडिया...' - मोदींचा नवा मंत्र
| 'या, भारतात निर्माण करा आणि जगभरात कुठेही जाऊन विका'
| भारताची शक्तीही असेल, पण विश्वाला आवाहन करतोय...
| विश्वाला आवाहन, तरुणांना काम द्यायचं असेल तर उत्पादन क्षमतेला बळ द्यावं लागेल
| 'जॉब क्रिएटर' तरुणांचं सामर्थ्य तयार करायचंय
| जगाला स्किल्ड वर्कफोर्सची गरज
| सरकारी सेवक जॉब नाही, तर सेवा करत आहेत
| 'ई गव्हर्नन्स ते गुड गव्हर्नन्स'
| राष्ट्रकुल खेळांत यश मिळवणाऱ्या 29 मुलींचं अभिनंदन
| राष्ट्रकुल खेळांत 64 पैकी 29 पदकं मुलींची 
| मुलांच्या आशेनं मुलींना बळी चढवू नका, प्रत्येक आईला आवाहन
| तिजोरी भरण्यासाठी एखाद्या आईच्या मुलीला मारू नका, डॉक्टरांना आवाहन
| 1000 मुलांमागे 940 मुली, हे समाजाचं असंतुलन
| आत्तापर्यंत केलेल्या पापांना मागे टाका आणि सदभावनेच्या मार्गावर या
| माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा
| शांती, एकता, सदभावना, बंधुभाव आपल्याला पुढे न्यायला मदत करेल
| जातीवादाचं, हिंसाचाराचं विष फेकून द्या
| हिंसा नको, बंधुभाव हवा
| अहिंसेचा मार्ग सोडा, ही वेळेची गरज
| हिंसेच्या मार्गावर गेलेल्या त्या तरुनांनो, भारतमातेनंही तुम्हाला काहीतरी दिलंय
| प्रत्येक आई-वडिलांनी जबाबदारी घ्यावी
| कायदे आपले काम करणारच, पण समाजाचंही काही कर्तव्य आहेत
| केवळ मुलींवरच बंधनं कशासाठी? - मोदी
| आई-वडिल मुलींना अनेक प्रश्न विचारतात, पण मुलांनाही विचारतात का?
| बलात्काराच्या घटना लाजिरवाण्या
| गतिशील सरकार बनविण्याचा प्रयत्न
| एक दिशा, एक लक्ष्य, एक गती, एक मंत्र
| देशवासियांच्या मनात देशहित जागवणार
| संसदेचं सत्र आमच्या विचारांचं प्रतीक
| माझ्या भाषणाचे राजकीय अर्थ काढू नयेत
| सरकारच्या यशाचं श्रेय विरोधकांनाही
| देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा, मजुरांचा वाटा
| बहुमतानं नव्हे, सहमतीनं पुढे जायचंय
| सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करणार
| देश नेत्यांनी नव्हे जनतेनं बनवलाय
| 'मी पंतप्रधान नाही तर प्रधान सेवक' - नरेंद्र मोदी
| पंतप्रधानांकडून जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
| लाल किल्ल्यावर डौलानं फडकला तिरंगा

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.