सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड

 भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

Updated: Sep 23, 2015, 01:02 PM IST
सोशल मीडियात नरेंद्र मोदी यांनी केला रेकॉर्ड title=

मुंबई :  भारतात ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइट वर सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटीच्या यादीत तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुन्हा एक रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. मोदी यांना आता ट्विटरवर १ कोटी ५० लाख फॉलोवर्स फोलो करतात. बराक ओबामांनंतर जागतिक स्तरावर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. ओबामा यांना जगभरातून ६ कोटी ४३ लाख जण फोलो करतात. 

ट्विटरवर फोलो करणाऱ्यांमध्ये जागतिक नेत्यांमध्ये दुसऱा क्रमांक पटकाविणारे मोदी हे पहिले भारतीय आहे. भारतात पहिला क्रमांक अमिताभ बच्चन यांचा आहे त्यांना १ कोटी ७० लाख फॉलोवर्स आहेत तर शाहरूख खान यांचा दुसरा क्रमांक लागतो, त्याला १ कोटी ५३ लाख फॉलोवर्स आहेत. तर तिसरा क्रमांक मोदींचा लागतो. 

मोदी ट्विटरवर खूप अॅक्टीव आहेत या प्लॅटफॉर्मचा आपल्या आयडीया शेअर करण्यासाठी चांगला वापर करतात. त्यांच्या फॉलवर्सच्या संख्येत गेल्या वर्षभरात खूप वाढ झाली आहे. ही संख्या ८८ लाख इतकी वाढ वर्षभरात झाली आहे. वर्षभरात सर्वाधिक वाढ दर्शविणारे हे एकमेव ट्विटर हँडल आहे. 

तसेच सर्वाधिक ट्विटर करण्याचा रेकॉ़र्डही मोदींच्या नावावर आहे. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक ट्विट केले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.