पंतप्रधानांच्या भाषणाने प्रस्थापित केला नवा रेकॉर्ड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी दिलेल्या भाषणानं एक वेगळाच रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

Updated: Jan 30, 2017, 09:10 AM IST
पंतप्रधानांच्या भाषणाने प्रस्थापित केला नवा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळी दिलेल्या भाषणानं एक वेगळाच रेकॉर्ड प्रस्थापित केलाय. 

मोदींच्या वर्षअखेरीच्या भाषणाच्यावेळी देशातल्या हिंदी न्यूज चॅनलच्या इतिहासतला सर्वाधिक टीआरपी मिळालाय. मोदींचं हे भाषण आयपीएल 2016च्या फायनलपेक्षाही लोकप्रिय ठरल्याचं बार्क या प्रेक्षक संख्या मोजणाऱ्या एजन्सीनं म्हटलंय.

8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी नोटाबंदींची घोषणा केली. त्यानंतर बरोबर 50 दिवसांनी म्हणजे 31 डिसेंबरला मोदींनी देशाला संबोधिक केलं. खरंतरं 31 डिसेंबरला देश पार्टीच्या मूडमध्ये असतो पण त्यादिवशी संध्याकाळी साडे सात वाजल्यापासून मात्र हिंदी न्यूज चॅनल्सना इतिहासातला सर्वाधिक टीआरपी मिळालाय.