पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र

भारतच नाही तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या मानवतावाद विरोधी आणि दहशतवादी कारवायांशी परिचीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना पाकिस्तानवर टीका केली आहे. दक्षिण आशियामध्ये एक देश आहे जो फक्त दहशतवादाचा विकास करु इच्छितो.

Updated: Apr 8, 2017, 06:16 PM IST
पंतप्रधान मोदींचं पाकिस्तानवर टीकास्त्र title=

नवी दिल्ली : भारतच नाही तर संपूर्ण जग पाकिस्तानच्या मानवतावाद विरोधी आणि दहशतवादी कारवायांशी परिचीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशमध्ये १९७१ साली झालेल्या युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांच्या सन्मान सोहळ्यात बोलतांना पाकिस्तानवर टीका केली आहे. दक्षिण आशियामध्ये एक देश आहे जो फक्त दहशतवादाचा विकास करु इच्छितो.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, भारतासोबत शेजारील देश देखील विकासाच्या रस्त्यावर अग्रेसर असावे. भारत आणि बांगलादेश विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे तर दुसरीकडे एका देशाची मानसिकता ही दहशतवादाला प्रेरणा आहे. त्या देशाचा विचार ज्याचा वॅल्यू सिस्टम मानवता नाही तर हिंसा आणि दहशतवाद आहे. त्या देशाच्या निर्मात्यांना मानवता पेक्षा दहशतवाद मोठा वाटतो. विकासापेक्षा मोठा विनाश वाटतो. अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर टीका केली.