जयपूर : काँग्रेसचे महासचिव गुरूदास कामत यांनी मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. स्मृती इराणी यांच्या विरोधात अनेक अपशब्दांचा वापर केला.
कामत यांनी स्मृती यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की 'अशिक्षित' स्मृती इराणी आता 'मै तुलसी तेरे आंगन की' झाली आहे. त्यांनी इराणी यांना कामवाली बाई म्हणत त्यांच्या घरची आर्थिक स्थिती खराब होती, अशीही संभावना केली आहे.
गुरूवारी एका स्थानिक निवडणुकीसाठी पालीमध्ये गुरूदास कामत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कामत म्हटले, दहावीपर्यंत शिक्षण झाल्याने स्मृती वर्सोवातील एका हॉटेलमध्ये टेबल साफ करत होती. ते म्हणाले, सरकार स्थापन केल्यावर नरेंद्र मोदी यांनी स्मृती इराणी यांना मंत्री बनविले. कामत यांनी पंतप्रधान मोदीवर तोफ डागत म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी 'अशिक्षित' इराणींना 'खासगी स्वार्था'साठी कॅबिनेटमध्ये जागा दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.