जयपूर : गुलाबी शहर जयपूरमध्येही आज मेट्रो धावली. दिल्ली, मुंबई पाठोपाठ जयपूर शहरातही आजपासून मेट्रो रेल्वे धावली.
दिल्ली, नोएडा, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरु या शहरानंतर आता मेट्रो सिटी म्हणून जयपूर सहाव्या क्रमांकावर आहे. भारतातील एक महत्वाची हायटेक मेट्रो म्हणून जयपूर मेट्रोला ओळखण्यात येणार आहे.
मेट्रो रेल्वे ही येथील मानसरोवर स्टेशन ते चापोळ स्टेशन दरम्यान धावणार आहे. तसेच या मेट्रोची १२३० प्रवाशी घेऊन जाण्याची क्षमता आहे.
जयपूरकर आणि पर्यटकांचा प्रवास सुखद आणि वेगवान करणाऱ्या या मेट्रो रेल्वेला आज मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी हिरवा कंदील दाखविला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.