क्रेडिट कार्डांच्या सुरक्षेसाठी आता पिन नंबरचाही पर्याय

रिझर्व्ह बँकेनं क्रेडिट कार्डधारकांच्या सुरक्षित व्यवहारासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 13, 2013, 02:54 PM IST

www.24taas.com, मुंबई
रिझर्व्ह बँकेनं क्रेडिट कार्डधारकांच्या सुरक्षित व्यवहारासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय. त्याचाच एक भाग म्हणून एटीएमप्रमाणेच आता कार्ड स्वॅपिंगसाठी पिन नंबरचा पर्याय देण्यात येणार आहे. जुलै महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे.
सुरुवातीला बिलावर सही आणि पिन नंबर हे दोन पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध असतील. पिन नंबरचा प्रयोग यशस्वी झाला तर तो पूर्णपणे अंमलात आणला जाण्याची शक्यता आहे. यानुसार कोणत्याही ग्राहकानं एकदा पिन नंबरचा वापर केला आणि त्याचं कार्ड चोरीला गेलं तरी पिन नंबरच्या असल्यानं त्याच्या खात्यातून इतर कोणालाही पैसे काढता येणार नाहीत.

सध्या क्रेडिट कार्डने पेमेंट करताना सुरक्षेचा उपाय म्हणून खरेदी बिलावर ग्राहकाची केवळ सही घेतली जाते. मात्र, सायबर क्राइमच्या वाढत्या घटना बघता ते पुरेशे नसल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आलंय. यामागे आंतरराष्ट्रीय सायबर रॅकटेचा हात असून रिटेल शॉप्समधून क्रेडिट कार्डांची माहिती मिळवून त्यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचं आत्तापर्यंत अनेकवेळा उघड झालंय.