www.24taas.com, नवी दिल्ली
१९९३ मधल्या दिल्ली स्फोटातला आरोपी देविंदर पाल सिंग भूल्लर याची फाशी सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवलीय. फाशीची शिक्षा रद्द करावी याबाबत भूल्लरनं दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली.
१९३३ मध्ये दिल्लीमध्ये दिल्ली युवक काँग्रेस ऑफिसबाहेर घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात नऊ जणांचा बळी गेला होता. या प्रकरणात १९९५ मध्ये भुल्लरला जर्मनीतून अटक करण्यात आलं. त्याला २००२ साली हायकोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली. त्याच वर्षी म्हणजेच २००२ मध्येच सुप्रीम कोर्टानंही भुल्लरच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं. २०११ मध्ये राष्ट्रपतींनीही त्याची द्येची याचिका फेटाळली होती.
याच निर्णयावर त्यानं दया याचिका दाखल केली होती. आपल्या फाशीच्या शिक्षेला उशीर झाल्यानं आपली फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी यात भुल्लरनं केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं त्याच्या शिक्षेत बदल हे कारण फेटाळून लावतं त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवलीय. भुल्लर सध्या तिहार जेलमध्ये आहे.