मोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती

कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत. 

Updated: Sep 17, 2015, 04:59 PM IST
मोबाईल अॅप, SMS,मिस्ड कॉलद्वारे पीएफ खातं आणि पेंशनची माहिती title=

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ)नं पीएफ अकाऊंटच्या डिटेल्स मिळविण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन आणि इतर फोन आधारित सेवा सुरू आहे. ईपीएफओच्या सदस्यांसाठी तीन नवे मोबाईल अॅपवरील सेवा सुरू केल्या आहेत. 

आणखी वाचा  - सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं आकर्षक 'गिफ्ट'

मोबाईल अॅप्लिकेशन, एसएमएसवर आधारित यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर एक्टिव्हेशन आणि मिस्ड कॉल सर्व्हिस, जाणून घ्या आपल्या पेंशनच्या डिटेल्स कशा मिळवायच्या.

पाहा EPFOच्या मोबाईल अॅपमुळे कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल -

१. ईपीएफओच्या वेबसाइटवरून नवीन मोबाईल अॅप डाउनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईल फोनमधून यूएएन खातं सुरू करू शकता. त्यानंतर आपल्या खात्यात महिन्याभरातील माहिती आपण पाहू शकला. याचप्रमाणे ईपीएफओ पेंशन धारक या मोबाईल अॅपद्वारे आपल्या पेंशनबद्दलची सर्व माहिती मिळवू शकतात.

२. एसएमएसवर आधारित यूएएन अॅक्टिव्हेशन - ही नवीन सेवा असे सदस्य जे कंप्युटर किंवा स्मार्टफोन वापरत नाहीत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. त्या सेवेसाठी 7738299899 या नंबरवर आपला यूएएन नंबर एसएमएस करा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. 

३. मिस्ड कॉल सेवा - या सेवेअंतर्गत आपल्याला जर आपल्या ईपीएफ खात्याचं अकाऊंट बॅलेंस माहिती करून घ्यायचं असेल तर 01122901406 यानंबरवर मिस्ड कॉल द्या. मिस्ड कॉल दिल्यानंतर आपल्याला एक एसएमएस येईल. ज्याद्वारे आपल्याखात्यातून पीएफ किती कापला गेला आणि किती राशी शिल्लक आहे ही माहिती मिळेल. 

यामुळे ईपीएफओच्या ३.५४ करोड भागधारकांना, ४९.२२ लाख पेन्शनधारकांना तसंच ६.१ लाख नियुक्तांना लाभ होईल. श्रम व कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनी हैदराबादमध्ये केंद्रीय न्यासी बोर्डाच्या आज झालेल्या २०८ व्या बैठकीच्या पूर्वसंध्येला मोबाईलवर आधारित या सेवांना सुरुवात केली. 

कामगार मंत्रालयानं दिलेल्या जाहिरातीनुसार, नव्या मोबाईल आधारित सेवा ईपीएफ भागधारकांसाठी आहे. यात एक मोबाईल अॅप, एसएमएस आधारित सर्वव्यापी खाते संख्या चालू करणं तसंच मिस्ड कॉल सेवेचाही समावेश आहे.

आणखी वाचा  - सातव्या वेतन आयोगात पगारात १५-२० टक्के होणार वाढ!

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.