नवी दिल्ली : तुम्हाला हे माहीत आहे का की पेट्रोल आणि डिझेलची किंमत एक लिटर बाटलीबंद पाण्यापेक्षाही कमी आहे. केवळ सरकार पेट्रोल आणि डिझेलवर लादत असलेल्या अबकारी करामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होते.
शुक्रवारी कच्च्या तेलाच्या एका बॅरची किंमत १९५५.८६ रुपये इतकी होती. एका बॅरेलमध्ये १५८ लीटर कच्चे तेल असते. आपण या किंमतीला भारतीय रुपयांमध्ये रुपांतरित केले. तर प्रत्येक लीटरमागे कच्च्या तेलाची किंमत केवळ १२.३० लीटर इतकी होते.
एक लीटर पाण्याच्या बाटलीची किंमत २० रुपये आहे. म्हणजेच एक लीटर पाण्यापेक्षाही पेट्रोल, डिझेल स्वस्त आहे. सध्या दिल्लीत नॉन ब्रांडेड पेट्रोलची किंमत ५९.३५ आणि डिझेलची किंमत ४५.०३ रुपये आहे.