दहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली

पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिस-या दिवशीही अखेर 56 तासानंतर संपली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. 

Updated: Oct 12, 2016, 04:49 PM IST
दहशतवादी आणि जवानांमधली चकमक 56 तासानंतर संपली title=

जम्मू काश्मीर : पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये सुरू असलेली चकमक तिस-या दिवशीही अखेर 56 तासानंतर संपली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र अजूनही कोणत्याही दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागलेला नाही. 

या एन्काऊंटर मोहिमेत भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईकमधील 9 पॅरा कमांडोसुद्धा सहभागी झाले होते. आंत्रप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या इमारतीत दडून बसलेल्या दहशतवाद्यांना हुसकावण्यासाठी सोमवार पहाटेपासून लष्कराचं ऑपरेशन सुरू आहे. लष्करानं उखळी तोफांचा मारा तसंच गोळीबार सुरू ठेवलाय. यामुळे इमारतीची अक्षरशः चाळण झाली. या इमारतीत गेल्या आठ महिन्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे.