श्रीनगर: पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. आज पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाल्याचं वृत्त असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाकिस्तान सैन्याच्या रेंजर्सकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. आजसकाळी पाकिस्तान रेंजर्सनी जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला.
गेल्या आठवडाभरात पाक सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची ही सहावी घटना आहे. भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पाकसोबत योग्य वेळी चर्चा होईलच पण तोपर्यंत सीमा रेषेवर भारतीय सैन्याला पाकला चोख प्रत्युत्तर देऊ असं विधान केलं होतं. त्यानंतर लगेलच हा हल्ला झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.