'भारतात विलीन होण्याबाबत पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी'

भारतामध्ये विलीन व्हावं का नाही यासाठी पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी

Updated: Feb 5, 2017, 11:00 PM IST
'भारतात विलीन होण्याबाबत पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी' title=

हरिद्वार : भारतामध्ये विलीन व्हावं का नाही यासाठी पाकिस्ताननं जनमत चाचणी घ्यावी, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लगावला आहे. काश्मीरमध्ये जनमत चाचणी घ्यावी यासाठी पाकिस्तानकडून युनायटेड नेशन्समध्ये वारंवार प्रयत्न केले जातात, त्यावर बोलताना राजनाथसिंग यांनी ही टीका केली आहे.

काश्मीर भारताचा भाग होता, आहे आणि राहिल अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे. हरिद्वारमध्ये झालेल्या प्रचारसभेमध्ये राजनाथ सिंग बोलत होते.