बोट जळाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत ऑन होते दहशतवाद्यांचे सॅटेलाइट फोन

नववर्षाच्या स्वागतापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर जळालेल्या बोटीबद्दल तपास यंत्रणांनी नवा खुलासा केलाय. बोट बुडाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत नावेतील संशयित दहशतवाद्यांचे दोन्ही सॅटेलाइट फोन ऑन होते. 

Updated: Jan 11, 2015, 08:19 PM IST
बोट जळाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत ऑन होते दहशतवाद्यांचे सॅटेलाइट फोन title=

अहमदाबाद: नववर्षाच्या स्वागतापूर्वी गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर जळालेल्या बोटीबद्दल तपास यंत्रणांनी नवा खुलासा केलाय. बोट बुडाल्यानंतर 6 जानेवारीपर्यंत नावेतील संशयित दहशतवाद्यांचे दोन्ही सॅटेलाइट फोन ऑन होते. 

एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार या दोन्ही नंबर्सवर संशयितांनी बोटीवर असतांना वापर केला होता. दोन्ही नंबर्सना अनेक महिन्यांपासून नॅशनल टेक्निकल रिसर्च संघटना (एनटीआरओ)च्या देखरेखीखाली ठेवलं गेलं होतं. या नंबर्समुळेच कोस्ट गार्डला समुद्रात त्या बोटीच्या हालचालींबद्दल माहिती मिळत होती. 

या फोनवर थायलंड आणि UAEच्या नंबर्सवरून कॉल केले जात होते. एनटीआरओनं हा नंबर स्मगलिंग रॅकेटचा असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

कोस्ट गार्डनं दोन्ही सॅटेलाइट फोन नंबर्सच्या आधारे त्यांची माहिती दिली होती. पोरबंदरमध्ये किनाऱ्यावर बोटीवर चौघांना पाहिल्या गेलं होतं. ज्यांनी कोस्टगार्डच्या चेतावणीकडे दुलर्क्ष केलं होतं. मात्र कोस्टगार्ड त्यांच्यापर्यंत पोहोचणार तोच बोटीतील दहशतवाद्यांनी बोटीला बॉम्बनं उडवून दिलं.

गुप्तहेर यंत्रणांनी सांगितलं की, नाव कराचीहून निघाली होती. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आपल्या प्रतिक्रियेत बोट पाकिस्तानी सेवांशी संपर्कात असल्याचं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.