देशातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर

पद्मिनी प्रकाश या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यूज अँकर ठरल्या आहेत. दक्षिण भारतातल्या एका न्यूज चॅनेलच्या संचालकांनी त्यांना न्यूज अँकर म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे. 

Updated: Sep 28, 2014, 01:26 PM IST
देशातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर title=

चेन्नई : पद्मिनी प्रकाश या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर न्यूज अँकर ठरल्या आहेत. दक्षिण भारतातल्या एका न्यूज चॅनेलच्या संचालकांनी त्यांना न्यूज अँकर म्हणून काम करण्याची परवानगी दिली आहे. 

लोटस टेलिव्हिजनवर सायंकाळी पद्मिनी प्रकाश आपला प्राईम शो करते. पद्मिनी प्रकाश आणि प्रेक्षकांसाठी हा शो फक्त एका दिवसासाठी नाही, ज्या प्रकारे महिला दिवस आणि बाल दिवसासाठी न्यूज चॅनेल्सवर शो होतात, तसा एक दिवसाचा हा शो नाही.

पद्मिनी प्रकाश यांचा व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा

पद्मिनी इतर काही चांगल्या न्यूज अँकर प्रमाणे आपल्या बुलेटीनविषयी उत्साहीत असते, माहिती घेत असते, कोणतीही चूक होणार नाही, अडखळणार नाही याची काळजी पद्मिनी घेत असते. ती आता बुलेटीन वाचण्यात निष्णात झाली आहे.

ट्रान्सजेंडरही सर्व कामं करू शकतात, त्यांना संधी द्यायला हवी असं पद्मिनी प्रकाश यांनी म्हटलं आहे. 

पद्मिनी प्रकाशकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन सन्मानाचा आहे. मात्र लोकांसाठी तो कुतूहलाचा आणि चर्चेचाही विषय ठरतोय. 

या माध्यमातून कोणताही लिंगभेद न करता सर्वांना समान संधीची दालनं खुली असल्याचा संदेश दिला जात आहे.  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं ट्रान्सजेंडरना तिसरं लिंग म्हणून मान्यता दिली आहे. लोटस हे तामिळ न्यूज चॅनेल आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.