…हा दानशूर १६,००० कोटींची संपत्ती करणार दान!

‘वेदांता रिसोर्सेझ’चे मालक अनिल अग्रवाल यांनी त्यांच्याकडील ७५ टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Sep 28, 2014, 01:40 PM IST
…हा दानशूर १६,००० कोटींची संपत्ती करणार दान! title=

नवी दिल्ली : ‘वेदांता रिसोर्सेझ’चे मालक अनिल अग्रवाल यांनी त्यांच्याकडील ७५ टक्के संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतलाय.

त्याच्याकडे तब्बल २१,३८५ कोटी एवढी संपत्ती आहे. म्हणजे अग्रवाल कुटुंब जवळपास १६,००० कोटी रुपयाची संपत्ती दान करणार आहे.

अनिल अग्रवाल हे सध्या भारतातील श्रीमंत लोकांच्या यादीत २४ व्या क्रमांकावर आहेत. ‘लंडन स्टॉक एक्सचेंझ’मध्ये वेदांताच्या लिस्टिंगला १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अग्रवाल यांनी आपली संपत्ती दान करण्याची घोषणा केलीय. 

‘माझ्यासाठी पैसा म्हणजे सर्वकाही नाही... जे कमवलंय ते समाजाला परत करायचंय...’ असं अग्रवाल यांनी म्हटलंय. आत्तापर्यंत जगातील सर्वात मोठा दानशूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिल गेट्स यांची भेट घेतल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय.  

यानंतर अनिल अग्रवाल हे जगातील नवव्या क्रमांकाचे आणि भारतातील प्रथम क्रमांकाचे दानवीर ठरलेत.

जगातील मोठे दानवीर...
१. बिल गेट्स – १,७१,१००  
२. वारेन बफेट – १,०५,४०० 
३. जॉर्ज सोरोस – ५१,९०० 
४. गॉर्डन मूर – ३०,५०० 
५. अजीम प्रेमजी – १२,८००  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.